Saturday, 5 November 2016

अस्तित्वाची जाणीव आम्हाला परत करायला लावु नका
मराठ्याची औलाद आहे आम्हाला परत सांगायला लावु नका
इतिहास आहे आमचा स्वराज्य घडवलं आपल्या राजानं
अफाट धन पेरलं बहुजनांच्या उद्धारासाठी आपल्या या धन्यानं
शक्तिशाली शत्रूला देखील झुकवल होतं त्यांच्या त्या गनिमी काव्यानं
समाज हितासाठी लढणाऱ्या माझ्या बांधवांना
जातीयवादी ठरवलं गेलं काही चुकीच्या विधानांनं
काय चुकीचं केलयं हो या माझ्या समाजानं
ऐके काळी मोठमोठया रणांगणात लढणारा मावळा आज मिळण त्या नोकरीवर आणि मिळण त्या पगारावर समाधान माणतोय
आज गुणवत्ता असुनदेखील मागे पडतोय
काळ्याआईचं रक्षण करणारा, सर्वांसाठी शेतात धान पिकवणारा, तुमच्या आमच्यासारख्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी राबणारा शेतकरी, समाजहितासाठी प्राणपणाने लढणारा हा मावळा नैराश्याच्या छायेत आज आयुष्य संपवतोय
सरकारी योजना, नियम आणि कायदे कागदावरच प्रभावी ठरतात
पण त्यांच संचलन करणारे मात्र हतबल, संकुचित प्रव्रुत्तीचे आणि नुसता आश्वासनांचा बोलबाला करणारे वाटतात

     ©  स्वप्निल जाधव

Friday, 19 August 2016

१५ अॉगस्ट निमित्ताने खुप दिवसांनी शाळेत गेलो...
लय भारी वाटलं माझ्या मित्रांनी भाषण केलं
शेवटी माझा नंबर आला अस वाटलं पण मैडमनी दुसऱ्याच
नाव घेतलं मनात आल चला एकदाच बरं झालं
पण एक डाव असही वाटलं रात्री लिहिलेल्या कवितेचं काय
करणार मनातल्या भावना मनात अशाच आणि लिहिलेल्या
कागदाच्या पानात तशाच दडुन ठेवणार
परत एकवार सरांकडे बघितलं नि म्हणालो सर दोन मिनिटं फक्त
मग स्टेजवर मैडमनी नाव घेतलं
गेलो सगळ्यांकडे बघितल्यावर थोड हसलो
नर्वस पण होतो थोडा
कारण कॉलेजच्या दिवसातली बोलण्याची सवय मोडली होती आणि ४-५ वर्षांनी एवढ्या लोकांसमोर स्टेजवर बोलणं  अवघड जात होतं
बोलता बोलता माईकमधुन आवाज येत नव्हता याचही भान मला राहिलं नव्हतं
पण कवितेद्वारा आमच्या शाळेबद्दलच्या भावना काही लोकांना
समजल्या याबाबतीत मला खुप बरं वाटलं
आमच्या शाळकरी आयुष्याचा प्रवास आणि आठवणी सांगणारी
ही कविता मी माझ्या सर्व शाळकरी मित्र, मैत्रिणींना, शिक्षकांना
आमच्या शाळेतील मावशींना
आणि कै.श्री.वामनराव ओतुरकर सर व श्रीमती ओतुरकर मैडम
यांना समर्पित करत आहे...
कारण त्यांच्यामुळे ही
आपली शाळा घरापासून सुरू झाली आणि आपल्या भागात घराघरात पोहोचली
शाळा...
खुप प्रेमाच,जिव्हाळ्याच,आपुलकीची नातं निर्माण करण्याच पहिल पाऊल
नव्या दिशेनी जगण्याची चाहुल
अनोळखी माणसांच्या सानिध्यात जगण्याची पहिली वाट
विचारांच्या प्रगल्भतेसाठी आपल्या
आई-बाबांनी घातलेला जणु कात्रजचा घाट
शाळा म्हटलं की खुप गोष्टी आठवतात
आपल्या भल्यासाठी आपल्याला मारणारे
चुका सुधारवण्यासाठी सतत ओरडणारे
आपले शिक्षक
सरांनी/मैडमनी मारल्यावर मिश्किलपणे
आपल्यावर हसणारे आणि अचानकपणे
एखाद्या प्रश्न विचारल्यावर ताडकन उठुन त्या प्रश्नावर उत्तर देताना पोपटपंची करणारे
आपले दोस्त
शाळा भरल्यावर गेट बंद करताना (ए चल रे जा वर्गात) अशा ओरडणाय्रा पण
शाळा सुटल्यावर घरचं कुणी आल नाही तर (बाळा आज कुणी आल नाही का) अस तितकचं जबाबदारीने आणि प्रेमाने विचारणार्या
मावशी
या सर्वांची एकच इच्छा असते
आपण खुप शिकावं मोठ व्हावं
स्पर्धेच्या या युगात स्वतः तरावं
इतरांना मार्गदर्शन करावं
येणाऱ्या संकटांना उरुन पुरावं
डोळे दिपवणारं यश मिळवावं
प्रेमाने आणि आदराने सर्वांशी वागावं
बेभान होऊन जगावं
आई-बाबांच्या स्वप्नांना ज्ञानरुपी पंखांनी बळ द्यावं

© स्वप्निल जाधव

Thankx to all being part of my life
You all are so precious for me
keep in touch guys...